Breaking News

केज तालुक्यातील १९ ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.९४ टक्के मतदान : तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान

गौतम बचुटे । केज  

केज तालुक्यात एकूण १९ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत ८०. ९४ टक्के  मतदान शांततेत पार पाडले.

केज तालुक्यातील २३ ग्राम पंचायतीच्या निवडणुकित घाटेवाडी, मोटेगाव, शिंदी, आंधळेवाडी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित वाघेबाभूळगाव, नारेवाडी, मुंडेवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, भोपला, कोरडेवाडी, पैठण, रामेश्वरवाडी, काशिदवाडी, बानेगाव, येवता, पाथरा, जाधवजवळा, लाखा, विडा/गौरवाडी, दरडवाडी, धोत्रा, बोबडेवाडी आणि सुकळी या १९ गावात१५ जानेवारी रोजी शांततेत मतदान झाले. दुपार पर्यंत ५०.१५% मतदान झाले. तर त्या नंतर सायंकाळी ५:३० वा. पर्यंत एकूण ८०.९४% मतदान झाले. 

केज तालुक्यातील या १९ गावात एकूण २६३४१ मतदारांपैकी २१३२१ एवढया मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ११३७३ एवढे पुरुष तर ९९४८ एवढ्या स्त्रियांनी आपला हक्क बजावला.मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंढके, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार लक्ष्मण धस, सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सपोनि आनंद झोटे, संतोष मिसळे, विजय आटोळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, श्रीराम काळे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी यांचे पथक तैनात होते.


No comments