Breaking News

समाजहिताच्या कामासाठी प्रत्येकाने वेळ द्यायलाच हवा : माजी महापौर बापूसाहेब घडामोडे

शिरुर कासार : मुळात कासार समाज हा बोटावर मोजण्याइतपत असून त्यातच मी असा तो तसा हे करण्यापेक्षा प्रत्येक समाज बांधवांनी समाजाची परिस्थिती ओळखून सर्व तर आपण केवळ औपचारिकता होण्यापेक्षा कारण त्यातून काहीच साध्य होत नसल्याने प्रत्येकाने समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि समाज हित कशात आहे हे ओळखून सर्व समाज बांधवांनी समाजात प्रति वाहून घेऊन वेळ द्यायला हवा असे मत औरंगाबाद संभाजीनगर चे माजी महापौर बापूसाहेब घडामोडे यांनी सोमवंशी क्षत्रिय कासार समाज पुणे जिल्हा समिती समितीच्या मूळ शिरूर कासार चे परंतु पुणे येथील उद्योजक रमाकांत कानडे यांची निवड झाल्याने त्यांचा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरुन बोलताना मांडले.

       याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर पुणे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आचलारे  समितीचे माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट स्मिता धारूरकर अध्यक्ष रमेश तात्या जुन्नरकर ऍड सुपेकर आनंद डांगरे एडवोकेट हेमा डांगरे जयंत भडगळ अडवोकेट अशोक मोहिते विलासराव यंदे निशिकांत धुमाळ शिरूर कासार चे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील आदि मोठ्या संख्येने होते. 

     शिरूर कासार सारख्या छोट्या गावातून जाऊन पुणे येथे आपला व्यवसाय सुरु करून आज उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले रमाकांत कानडे  त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान पाहता आज पुणे जिल्हा कासार समाजाच्या विकास समिती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि या निवडीचा पदग्रहण सोहळा म्हणून श्री क्षेत्र आळंदी येथे पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी समाजातील सर्व बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरूर कासार येथील नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, कालिकादेवी संस्थानचे सचिव बापूराव गाडेकर, प्रमोद दगडे, पत्रकार अशोक भांडेकर,  भालचंद्र भांडेकर, नेकनुरसंस्थांच्या अध्यक्ष शिवाजीराव काटकर, उद्योगांतील शेटे, महारुद्र वीर काका,  अरुणराव  विलासराव भांडेकर यांचे रमाकांत बंधू संतोष कानडे काका प्रभाकर कानडे माऊली भांडेकर, श्रीमती सुमनबाई कानडे सौ रिया निंगुरकर  संस्थानचे अध्यक्ष सोलंकर गोविंद भांडेकर योगेश कानडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारच्या सत्रात गीत गायनाचा समूह कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी समाजातील तरुण-तरुणींनी या स्पर्धेचा स्पर्धेत भाग घेऊन आनंद व्यक्त केला शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन आणि आभार सासवडे यांनी मानले.No comments