Breaking News

बेलगावात दोन गट परस्परांना भिडले : परस्पर विरोधी तक्रारी दाखल


ग्रामपंचायतीच्या कामाची तक्रार महागात पडली !

तक्रारदारास लोखंडी गजाने मारहाण करून बोटातील अंगठ्या काढून घेतल्या

गौतम बचुटे । केज  

ग्रामपंचायतच्या कामांची तक्रार का केली? म्हणून केज तालुक्यातील बेलगाव येथे पाच व्यक्तींनी संगनमत करून एकास मारहाण करून त्याच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्याची घटना घडली आहे. तर प्रताप दातार यांच्यावरही त्यांनी एकाच्या कानशीलाला पिस्तुल लावून धमकी देत मारहाण केल्याचा तक्रार दाखल केली आहे.

या बाबतची माहीती अशी की, केज तालुक्यातील बेलगाव येथे दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०:१५ वा. प्रताप दातार वय (३९ वर्ष) हा स्कुटीवरून त्याच्या शेताकडे जात असताना पांडुरंग रधुनाथ चौरे, बालाजी रावसाहेब चौरे, नरसिंग सटवा चौरे, दत्तात्रय सरजेराव चौरे व प्रदिप सुधाकर घुले सर्व रा बेलगाव या पाच जणांनी त्यास संगनमत करून खंडेराय चौरे यांच्या घरा समोर अडविले व गैरकायदयाची मंडळी जमवुन त्यानी ग्रामपंचायतीचे केलेल्या कामाची तक्रार का केली? असे म्हणून शिवीगाळ करून काठीने व लोखंडी गजाने मारहाण केली.

या मारहाणीत प्रताप दातार याच्या डाव्या हाताला मार लागला असून कोपरा जवळ फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्याच्या हाताच्या बोटातील १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आहेत. प्रताप दातार याच्यावर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरू आहेत. त्याच्या तक्रारी नुसार दि. १ जानेवारी २०२१ रोजी केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. १/२०२१ भा. दं. वि. ३२६, ३२३, ३२७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ ५०४ व ५०६ प्रमाणे मारहाण करून गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर रित्या जमाव जमविणे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत. 

दरम्यान, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी पांडुरंग चौरे यांनी केज पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून तक्रारी म्हटले आहे की, त्यांना प्रताप नरसिंग दातार व नरसिंग लिंबाजी दातार आणि दोन अनोळखी व्यक्तींनी दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वा. पांडुरंग चौरे यांच्या बेलगाव येथील घरा समोर जाऊन त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून तुझा भाऊ कुठे गेला ? असे म्हणून चाकूने मारहाण केली. यात पांडुरंग चौरे याच्या डाव्या हाताच्या पोटरीला दुखापत झाली आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या चुलत भावाला पण काठीने व लाथा-बुक्यांनी मारहाण करून जखमी केले.

अशा प्रकारच्या तक्रारी नुसार केज पोलीस स्टेशनला प्रताप दातार, नरसिंग दातार व इतर दोन अशा चौघा आरोपी विरुद्ध गु. र. नं.  ५५९/२०२० भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायद्याचे कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचाही तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.

तसेच या प्रकरणी खंडेराय चौरे हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केज पोलीस स्टेशनला केली आहे व याचाही तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे करीत आहेत. हा सर्व प्रकार तालुक्यतील अवैद्य वाळू तस्करी व माहितीच्या अधिकारात कामांची मागितलेली माहिती; यातून सुरू असून महसूल यंत्रणा व पोलीसानी सतर्क राहण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच यामुळे एखाद्याच्या जिवीताला धोका संभवन्याची भीती नागरिकातून व्यक्त होत आहे.

No comments