Breaking News

नवी भाजी मंडईत महिलांसाठी स्वच्छतागृह बांधा- शेषेराव तांबे


बीड : 
गेली पंचवीस वर्ष बीड नगरपालिका ही क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. विकास कामांचा आव आणणाऱ्या क्षीरसागर यांनी बीड शहर भकास करण्याचे काम केले आहे. राजुरीवेस- बुंदेलपुरा- नेहरूनगर भागातून जुना नाला जातो तो नाला बऱ्याच ठिकाणी खचलेला आहे त्यामुळे सांडपाणी वाहून न जाता ते तिथेच साठवून राहिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून सामान्य नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. 


  बीड शहरातील नवी भाजी मंडई येथे आठवडी बाजार भरत असल्याने खेड्यापाड्यातून इथे जास्त प्रमाणात महिला भाजीपाला विकण्यासाठी येतात तसेच शहरातील अनेक महिलादेखील भाजीपाला खरेदीसाठी नवी भाजी मंडई येथे येतात. महिलांसाठी स्वच्छताग्रह नसल्याने महिलांची गैरसोय होते यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. अनेक वर्षापासून शिवसंग्राम येथे महिलांसाठी स्वच्छतागृह व्हावं यासाठी बीड नगरपालिकेकडे वेळोवेळी मागणी करत आहे तसेच निवेदनही देत आहेत परंतु बीड नगरपालिकेला याबाबत अद्यापही जाग आलेली नाही.

  बीड नगरपालिकेने राजुरीवेस- नेहरूनगर भागातून जाणाऱ्या नाल्याची कायम स्वरूपी उपाययोजना करावी व अहिल्यादेवी होळकर सभागृह,  नवी भाजी मंडई येथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावे. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या न गेल्यास शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांनी निवेदनामार्फत दिला आहे.

No comments