Breaking News

पैठण-बारामती महामार्गावरील धोकादायक रस्ता दुभाजक खड्डे बनले मृत्यूचा सापळा !


के. के. निकाळजे । आष्टी

आष्टी तालुक्यातील धामणगाव,कडा येथून जाणारा पैठण-बारामती राज्य महामार्ग.या महामार्गाचे  काम प्रगतिपथावर आहे,बहुतांश ठिकाणी जवळ-जवळ रोडचे काम पूर्ण झाली आहेत,पण ज्या ठिकाणी गाव किंवा शहर आहे आशा ठिकाणी दुभाजका सहित चौपदरी रस्ता आहे. या ठिकाणी मात्र  अनेक दिवसापासून रस्ता बनवण्याचे विविध कामे  अपूर्ण स्थितीतच आहेत.

यामध्ये प्रामुख्याने रस्ता दुभाजक  मधील खड्डे भरून साईटला सुरक्षा  सिमेंट कठडे बसवण्याचे काम चालू आहे पण ही कामे गेल्या अनेक दिवसापासून काही ठिकाणी अपूर्णच आहेत,रस्त्याच्या मधोमध ही कामे करताना खड्डा खोदण्यात आलेला आहे  हाच खड्डा या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरेल,त्याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या कामाकडे लक्ष देऊन संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला सूचना  देऊन काम लवकर करून घ्यावे,अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.नसता याठिकाणी काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदार संबंधित कन्ट्रक्शन कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का?असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.

No comments