Breaking News

निवडुंग कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात


जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके,  वि. दा. सावरकरचे अध्यक्ष बाजीराव  धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन

परळी : येथिल जागृती पतसंस्थेच्या मुख्य सभागृहात जाग्रती ग्रुपच्या कर्मचारी तथा परळी शहरातील नामांकित कथालेखक व कवीयत्री असणाऱ्या अलका सुरणर यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'निवडुंग' या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा आज नववर्ष प्रारंभिचे औचित्य साधत आज दि.1 जानेवारी रोजी  जागृती ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा परळी भूषण प्रा. गंगाधर शेळके सर, वि. दा. सावरकर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, आनंद हॉस्पिटलचे संचालक तथा समाजसेवक डॉ. राजाराम मुंडे सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की येथिल नामांकित कथालेखक व कवीयत्री असणाऱ्या श्रीमती अलका सुरणर यांच्या लेखणीतून शब्दबध्द झालेल्या निवडुंग या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नववर्ष आरंभाचे मुहुर्त साधत 1 जानेवारी 2021 रोजी येथील जागृती पतसंस्थेच्या मुख्य सभागृहात सहकाररत्न तथा परळी भूषण प्रा. गंगाधर शेळके सर, वि.दा. सावरकर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव धर्माधिकारी, प्रा. डॉ. विजयकुमार देशमुख, समाजसेवक डॉ. राजाराम मुंडे, कविवर्य अरुण पवार, प्रा. अवस्थी सर, श्री बडे साहेब, श्री रंगनाथ सावजी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. तत्पूर्वी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे आयोजक व जागृती ग्रुपच्या वतीने स्वागत करण्यात आले.यापूर्वीही लेखिका असणाऱ्या अलका सुरणर यांचे  कथासंग्रह व कवितासंग्रह तथा साहित्यिक रचना प्रसिद्ध झालेले असून परळीच्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या लिखाणाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

दरम्यान या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सरांनी जागृती ग्रुपच्या कर्मचारी व कथालेखिका असणाऱ्या सुरणर यांना प्रोत्साहन देत त्यांच्या नव्याने प्रकाशित झालेल्या निवडूंग कथासंग्रहास शुभेच्छा देत सर्वांना नूतन वर्षाच्या देखील शुभेच्छा दिल्या. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. राजाराम मुंडे यांनी देखिल यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा कथासंग्रह दर्जेदार असून संग्रही ठेवावा असाच आहे. तसेच यावेळी वि.दा. सावरकर बँकेचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनीदेखील मनोगत व्यक्त करताना निवडुंग कथासंग्रहास शुभेच्छा देत सर्वांना नववर्षा च्या ही शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कविवर्य अरुण पवार यांनी कवितारुपी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास जागृती ग्रुपचे सर्वश्री प्रल्हाद सावंत, हेमंत कुलकर्णी, बालाजी रामगिरवार, गोविंद भरबडे, सुधाकर शिंदे, श्री भाग्यवंत,दत्ता चव्हाण, श्री केदार देशमुख, सुनिल कोचे, राजेश मगर, सुनील चोभारकर, सौ. शिंदे, सौ. वैष्णव, सौ. बनसोडे, श्रीमती मगर व ठोंबरे मॅडम आदींची उपस्थिती होती. यावेळी येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे प्रा. अवस्थी सर यांनी आभार मानले.

No comments