Breaking News

शिवानंद प्रतिष्ठानतर्फे मास्क आणि हँडसॅनिटायझरचे वाटप


गौतम बचुटे । केज   

नेहरू युवा केंद्र आणि शिवानंद प्रतिष्ठान यांच्या वतीने कोरोना जनजागृती व मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

या बाबतची माहिती अशी की, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्र बीड आणि शिवानंद प्रतिष्ठान सोनिजवळा यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजक दशरथ चवरे यांनी दि. ४ जानेवारी रोजी केज येथील विश्राम गृहावर पत्रकारांच्या उपस्थितीत कोरोना बाबत जनजागृती आणि उपस्थितांना फेस मास्क व हँड सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या वेळी समाजसेवक रमेशर तात्या गालफाडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराज आरकडे, धनंजय कुलकर्णी ॲड. शेख यांच्यासह भास्कर मस्के, दादासाहेब ढाकणे, गोविंद शिनगारे, दशरथ चवरे, गौतम बचुटे आदी उपस्थित होते.

No comments