Breaking News

बी एल ओ पुन्हा हरवले घरोघरी फिरून मतदान कार्ड वाटप करा : सय्यद इलयास


बीड :  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पुन्हा हरवले असल्याची  तक्रार करून। बीए लोनी घरोघरी फिरून मतदान नोंदणी व मतदान कार्ड वाटप करावे अशी मागणी एम आय एमचे युवा नेते सय्यद इलयास यांनी केली आहे. 
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी एल ओ ) घरोघरी फिरून मतदान नोंदणी करावी. जेव्हा मतदार नोंदणीसाठो (बीएलओची) नियुक्ती केली जाते तेव्हा हे काम चुकार बीएलओ ना घरोघरी जाऊन मतदारांची नावे घेतात ना प्रत्येक प्रभागात एक ठिकाणी बसून मतदारांची नावे घेतात. यामुळे खरेखुरे मतदारांचे नाव मतदार यादीत येत नाही.  राजकीय लोक आपाआपले हितसंबंध वापरून शहर, तालुका, गावांच्या मतदारांची नावे मात्र इकडेही तिकडेही अशा तत्हेने सगळीकडे आपआपल्या मर्जीतील जवळचे संबंधिताचे नाव सगळीकडे लावून टाकतात। आणि जिकडे निवडणूक लागतील तिकडे त्याच्याकडून मतदार करून घेतात.
    अशा हरवलेल्या बीएलओ ना मतदार नोंदणी साठी घरोघरी पाठवावे। व मतदान केंद्रावर न बसून त्यांना त्याच प्रभागात 1 ते 2 जागांवर कॅम्प लावून बसविण्यात यावे, अशी मागणी ए आय एम आय एम जिल्हाध्यक्ष ॲड शफीक भाऊ व ते आय एम आय एम के जिल्हा प्रवक्ता हरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या मार्गदर्शन खाली ये आय एम आय एम के युवानेते सय्यद इलयास, पठाण शहनावाज खान, शेख मुजीब, आवेज मोमिन, कार्यकर्ता सह जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 
No comments