Breaking News

गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा - चंद्रकांत खैरे


शिवसैनिकांनो भगवा फडकवा ग्रामपंचायतींना निधी आम्ही देऊ - ना.संदिपानजी भुमरे साहेब

गौतम बचुटे । केज  

मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे साहेब यांच्या सुचने वरुन ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात बीड जिल्हा शिवसेनेची महत्त्वपुर्ण बैठक केज येथे पार पडली.

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळुक, जिल्हा प्रमुख कुंडलिकजी खांडे, गिरीशजी देशपांडे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रत्नमालाताई मुंडे व बांगरताई यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवुन गावातील विकास कामे करण्यासाठी कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची महाराष्ट्राची विकासाची गंगा गावा-गावात पोहोचावी असे आवाहन केले. 

रोजगार हमी व  लफलोत्पादन मंत्री ना. संदिपानजी भुमरे साहेब यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना या संपर्कमंत्री जिम्मेदारीने या सर्व योजना प्रत्येक गावात पोहोचवण्या करीता शिवसैनिकांनी कटिबद्ध रहावे. त्यासाठी मंत्री म्हणुन वचनबद्ध राहु असे अभिवचन दिले.

या वेळी जिल्हा प्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना सत्तेमध्ये बळ देण्यासाठी मंत्री महोदयांनी जिम्मेदारी द्यावी. असे आवाहन केले. गिरीशजी देशपांडे, शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी शिवसैनिकांच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडुन येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये सत्तेचा वाटा शिवसैनिकांना मिळवुन द्यावा. अशी मागणी केली.

या बैठकीला विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अतुल दुबे, रामराजे सोळंके, केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, परळी तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, वडवणी संदीप माने, धारुरचे बाळासाहेब कुरुंद, राजा पांडे, विनायक मुळे, बाळासाहेब शेप, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शिवसेना विधानसभा सरचिटणीस महाराणा घोळवे, तालुका संघटक अशोक जाधव, सचिव रामहरी कोल्हे, अनिल ठोंबरे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, राजेश विभुते, नागेश ढिगे, बाळासाहेब शिनगारे, बाळासाहेब पवार, कळसकर, उपतालुकाप्रमुख अभिजीत घाटुळ, विकास काशिद, सुनिल पटाईत, युवासेना शहरप्रमुख तात्या रोडे, अविनाश करपे, चंद्रकांत इंगळे, ज्ञानेश्वर बोबडे, बाळासाहेब राख, कैलास उगलमुगले, बाळनाथ केदार, लक्ष्मण गलांडे, अत्तम घाडगे, अक्षय भुमकर, विनोद पोखरकर, अशोक गाढवे,दिनेश जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनोरमाताई डोईफोडे, मनिषाताई गलांडे, घुले राधा ताई, रेखाताई घोबाळे, ज्ञानेश्वर शेळके, दिलीप बप्पा जाधव, राहुल फुके, प्रकाश केदार, भिमा धुमक, बाळासाहेब मेंडके यासह केज, अंबाजोगाई, परळी, धारुर, वडवणी, माजलगाव येथील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामपंचायतचे उमेदवार उपस्थित होते.

No comments