Breaking News

बीड जिल्ह्यातील नाराज काँग्रेसला पालकमंत्र्यांनी न्याय द्यावा : रवीकाका ढोबळे

बीड : महा विकास आघाडी सरकारमधील सर्व सहभागी पक्षाला समान न्याय देण्याच्या भूमिकेतून बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी  जिल्ह्यामधील मधील अशासकीय सदस्यांच्या कमिट्या व डीपीडीसी मधील कामांचे समन्यायी वाटप करण्याची मागणी काँग्रेसचे आष्टी तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी केली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डीपीडीसी मधील निधी वितरणात व शासकीय कमिटीमध्ये काँग्रेस पक्षाला स्थान मिळाले पाहिजे.  तसेच स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून कमिटी वाटपानंतर मोठ्या प्रमाणावरती नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता या अगोदर वाटप झालेल्या कमिटीमध्ये स्थानिक नेत्यांना व पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षनेतृत्वाने तसेच पालकमंत्री यांनी देखील विश्वासात न घेता त्याचे वाटप केलेले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये येणाऱ्या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन मंडळातील निधी उपलब्धतेनुसार जाहीर होणाऱ्या कामांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना त्यांच्या विभागातील विकास कामे करण्याकरिता निधीचे वितरण महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण करावे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच जिल्ह्यामधील काँग्रेसच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांना व पक्षासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांनाराष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्व मार्फत जाणीवपूर्वक डावलल्या जात असून कमिटी यामध्ये त्यांच्या नावाची शिफारस केली जात नाही म्हणून स्वतः पालकमंत्री यांनी जातीने लक्ष देऊन अशासकीय कमिट्या जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून कार्य करू इच्छिणाऱ्या समाजातील प्रतिष्ठित कार्यकर्त्याला न्याय देण्याकरिता पुढाकार घ्यावा असे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष म्हणूनकाँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या सर्व कमिट्या व डीपीडीसी मधील कामांचा निधी आपल्या विभागातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेकरिता उपलब्ध करून घेण्यामध्ये टाळाटाळ करू नये. असे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मिठे पाटील, आष्टी विधानसभा अध्यक्ष रवी काका ढोबळे, काकासाहेब कर्डिले, नामदेवजी लगड, सोमनाथ लगड, बाळासाहेब मधुरकर, अजित चव्हाण निवेदनात म्हटले आहे.

No comments