Breaking News

पन्नास हजाराची लाच घेताना चिंचोली माळीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात !


गौतम बचुटे । केज  

पाझर तलावात गेलेल्या संपादित जमिनीचे क्षेत्र कमी करण्यासाठी एक लाख रु. ची मागणी करून ५० हजार रु.ची लाच स्विकारताना केज तालुक्यातील चिंचोली माळी सज्जाचे तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील शेतकऱ्यांची जमीन टाकळी शिवारातील पाझर तलावात गेलेली आहे. त्या पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचे क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तलाठी दयानंद शेटे यांनी १  लाख रु. ची लाच मागितली. परंतु त्या शेतकऱ्यांना त्यासाठी पैसे देण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी लाचलुचपत संपर्क साधला. व ५० हजार देेन्यचच देण्याचे ठरविले. त्या नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. ९ जानेवारी रोजी दुपारी ३:०० तहसीलच्या आवारात तलाठी दयानंद शेट्टी शेटे व त्याचा खाजगी सहाय्यक सचिन घुले यास त्या शेतकऱ्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या बाबत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही सुरू असून तलाठी शेटे व त्याचा खाजगी लेखनिक सचिन घुले यास ताब्यात घेऊन केज पोलीस स्टेशनला हजर केले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते.  

तालुक्यातील अनेक तलाठी ही स्वतः काम करीत नसून सर्व कामे ही त्यांची खाजगी लेखनिक करीत असतात. खाजगी लेखनिक ठेवण्यामागे केवळ अशा प्रकारे गैरव्यवहार करून पैसे मागणी करण्या करिता ठेवलेले असतात.

No comments