बीड शहराला अतिक्रमणाचा विळखा - सचिन शहागडकर
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शिवस्वराज सामाजिक प्रतिष्ठानचे निवेदन
बीड : शहरात होत असलेल्या रस्त्याचा विकास अन होणारी दिरंगाई यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे शहरातील प्रत्येक प्रभागात अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसत आहे विशेष करून जिल्हा स्टेडियम शाळा महाविद्यालय, आदर्श असणारे महापुरुषांचे पुतळा परिसर, बशीर गंज परिसर ,बस स्टॉप, पोस्ट ऑफिस, शासकीय व निमशासकीय कार्यालये, सुरू नसलेली परंतु वास्तू तयार असलेली नवीन व जुनी भाजी मंडई परिसर तथा त्यासमोरील ओपन स्पेस वरील अतिक्रमणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला अस्वच्छतेमुळे धोका करत आहेत त्या अनुषंगाने प्रमुख रस्ते चौक व बाजारपेठा येथे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ बसवावेत असे निवेदन बीड जिल्हाधिकारी साहेब यांना शिवस्वराज सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ शहागडकर सह सहकारी यांनी दिले.
सदर निवेदनात खालीलपैकी मुद्दे आहेत
बीड शहरातील शासकीय मालमत्ते मधील व शासकीय कार्यालय परिसरातील अतिक्रमणे ,प्रभागातील खाजगी अतिक्रमणे व मुख्य रस्त्यावरील नाल्यावरील अतिक्रमणे पूर्णतः तात्काळ काढणे बाबत, शहरातील अतिक्रमणामुळे प्रभागातील लहान मुलास वयोवृद्धांच्या आरोग्याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे अतिक्रमणामुळे नाल्याची स्वच्छता होत नाही त्याकारणे शहरातील जनतेस अस्वच्छतेमुळे विविध आजारांना बळी पडावे लागत आहे.
बीड शहरातील सर्व महापुरुषांच्या परिसरात व प्रमुख चौकात सेवा सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. जेणेकरून वाढणाऱ्या चोऱ्या वर नियंत्रण बसेल तथा वाहतुकीच्या नियमाचे ही कठोर पालन होईल, शहरातील बाजारपेठा मुख्य रस्ते व सर्व शासकीय कार्यालय तथा सर्व महापुरुषांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणे येथे आठ दिवसात काढावेत नसता लोकशाही पद्धतीने आंदोलन उपोषण करण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद केले आहे सदर निवेदनाची प्रत मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद, मा.पालकमंत्री बीड यांना पाठवण्यात आलेली आहे.
No comments