Breaking News

उल्हास रुद्रवार, अमरनाथजी खुर्पे, अशोकराव शेजुळ, सुरेंद्रजी रेदासनी यांचा सत्कार

माजलगाव : लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशावरून व बँकेचे चेअरमन अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास रुद्रवार, अमरनाथजी खुर्पे,  अशोकराव शेजुळ,  सुरेंद्रजी रेदासनी यांची वैद्यनाथ अर्बन को-आँपरेटिव्ह बँक माजलगाव शाखेच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.


 नवनिर्वाचित सल्लागार यांचा सत्कार समारंभ आज माजलगाव शाखा याठिकाणी संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉ अशोकराव तिडके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष अरुणराव राऊत व तज्ञ संचालक  सौरभजी रेदासनी हे होते नवनिर्वाचित सल्लागार मा उल्हास शेठ रुद्रवार मा अमरनाथजी खुर्पे मा अशोकराव शेजुळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा नंदकुमारजी आनंदगावकर मा गजेंद्र खोत मा सत्यनारायण उनवणे मा छबनराव घाडगे शाखाधिकारी भगवानराव जाधव साहेब मा एम टी देशपांडे साहेब इत्यादी मान्यवर यांच्यासह कर्मचारी वृंद पिग्मी एजंट व बँकेचे हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते मनोज फरके यांनी केले.


No comments