Breaking News

मराठा आरक्षण अशोक चव्हाणांना द्यायचंच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कामात चव्हाणांची आडकाठी: आ. विनायकराव मेटे यांचा आरोप


औरंगाबाद मध्ये
शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक : आगामी काळातील महानगर पालिका, नगर पालिका नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार ; आ. मेटेंची घोषणा

औरंगाबाद : मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातून होऊ द्यायचं नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कामात आशोक चव्हाण आडकाठी निर्माण करत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. असा आरोप आ. विनायकराव मेटे यांनी करत आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या  निवडणुका शिवसंग्राम लढविणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

औरंगाबाद येथे शनिवारी (दि.10) शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. आ. मेटे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाबाबत नियमित आढावा घेत असत. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी व्यवस्थित माहिती देत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण बाबतीत अडचण निर्माण होत आहे. ते दूर करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे आ. मेटे यांनी सांगत उप समतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या कामात आडकाठी आणत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायच नाही. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्रभर संघटन बांधणीसाठी दौरा करण्यात येणार असून नव तरुणांवर जवाबदारी सोपण्यात येणार असल्याचे आ. मेटे म्हणाले.

शिवसंग्राम तडजोड करणार नाही !

सामाजिक प्रश्नांसाठी भलेही नुकसान झाले तरी चालेल मात्र समाजाच्या प्रश्नांवर कायमच शिवसंग्राम आवाज उठवले. समाज हितासाठी कधीही शिवसंग्राम तोडजोड करणार नाही. असंही आ. मेटे म्हणाले.

No comments