Breaking News

ज्येष्ठ पत्रकार व कॉम्रेड रशीद पठाण यांचे निधन


आष्टी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव व जुन्या पिढीतील पत्रकार कॉम्रेड रशीद पठाण यांचे  आज दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी कर्करोगाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 55 वर्ष होते. 

 अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रस्त्यावर उतरून त्यांनी अनेक आंदोलने केली. दैनिक रिपोर्टर या वर्तमानपत्राचे ते पहिले आष्टी तालुक्यातील प्रतिनिधी होते. दांडगा जनसंपर्क व लोकांमध्ये त्यांनी अल्प कालावधीमध्ये आपल्या कार्याची सोनू दाखवून दिली होती. संघर्षशील तत्वाला  धरून चालणारा नेता म्हणून त्यांच्याकडे ओळखले जायचे. 


गेल्या अनेक दिवसापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी बारा वाजून दहा मिनिटांनी त्यांचे दुःखद निधन झाले. आष्टीतील पत्रकार जावेद पठाण यांचे ते चुलते होते, त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले एक मुलगी आई,  बंधू असा परिवार आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर आष्टी येथील काली मजीत कब्रस्थान मध्ये  त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश धस, माजी शिक्षण सभापती नियामत बेग, पंचायत समिती सभापती अशोक मुळे,  नगराध्यक्ष भारत मुरकुटे, किशोर नाना हंबर्डे, युनूस शेख,झिया बेग,आष्टी  दूध संघाचे संचालक आत्माराम फुंदे, तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक सर्व उपस्थित होते.

No comments