Breaking News

माजलगावात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला पाच जणांचा चावा


माजलगावात रँबीज इंजेक्शनचा तुटवडा रुग्णांनवर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

माजलगांव : शहरातील शेतात काम करणाऱ्या पाच मजुरांना पिसाळ लेल्या या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना दिनांक १९  जानेवारी रोजी दुपारी दुगड  पेट्रोल पंपाच्या समोरील शेतामध्ये घडली आहे या रुग्णांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठेही  रेबीजचे इंजेक्शन न मिळाल्यामुळे रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

          माजलगाव शहरातील दीपक  संकलेजा यांच्या शेतामध्ये नेहमीप्रमाणे शेतमजूर प्रकाश राव थोरात सह  अन्य मजूर काम करत होते अचानक शेतामध्ये दिनांक १९ जानेवारी रोजी दुपारी एक दिडच्या दरम्यान पिसाळ या कुत्र्याने प्रकाशराव थोरात यांच्यासह ५ मजुरांचा चावा घेतला आहे पिसाळलेले कुत्रे चावलेल्या पाचही रुग्णांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे उपचारासाठी आणले असता रुग्णालयांमध्ये हे रेबीजचे इंजेक्शन  नसल्याचे सांगण्यात आले.

असता  तालुक्यातील  किट्टी आडगाव, टाकरवण, पात्रुड, सादोळा, गंगामसला, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही चौकशी केली असता तेथेही रेबीजचे इंजेक्शनचा तुटवडा आढळून आला आहे त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन उप ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज इंजेक्शन साठा कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांतून होत आहे.


No comments