Breaking News

आदर्श शिक्षण व्यवस्थे करिता शिक्षक -प्राध्यापकांनी कार्य करावे - प्रा.डॉ.डी.डी.गायकवाड

बीड : देश कार्याच्या पातळीचा दर्जा वाढवणे बाबत देशांतर्गत शिक्षण व्यवस्था व त्या व्यवस्थेसाठी कार्य करणारे शिक्षक प्राध्यापक यांच्या कार्याचा दर्जा वाढवणे महत्त्वाचे आहे. शैक्षणिक दर्जा शिवाय कोणत्याही क्षेत्रातील कार्याचा दर्जा मोठा होऊ शकत नाही,आधुनिक शिक्षण प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबर त्यांच्या कलात्मक गुणांना प्राधान्य देऊन समाज उपयोगी ज्ञान देणे गरजेचे आहे. हे केवळ शैक्षणिक व्यवस्था टिकविण्यासाठी नव्हे तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने आदर्श शिक्षण व्यवस्थेत करिता प्रत्येक शिक्षक प्राध्यापकांनी कार्य करावे असे मत शिक्षण सहसंचालक, औरंगाबाद चे मा. प्रा. डॉ. डी.डी गायकवाड यांनी व्यक्त केले.

 बीड जिल्हा मुप्टा संघटनेच्यावतीने क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे ते आपले मत व्यक्त करत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. प्रदीप रोडे (मुख्यसंपादक, मुक्ता न्यूज) प्रमुख अतिथी मा. भगवान वीर (उपायुक्त समाज कल्याण, नाशिक), मा. प्रा. सुनील मगरे (मुप्टाचे, संस्थापक सचिव), मा.संदीप उपरे (अध्यक्ष, ओबीसी परिषद महाराष्ट्र राज्य ),मा. प्रा. डॉ.संभाजी वाघमारे(विभागीय अध्यक्ष, मुप्टा)मा. शिवाजी चाटे( सचिव, यशवंतराव चाटे व तांत्रिक शिक्षण संस्था तांबवा) मा. अंकुश निर्मळ (अध्यक्ष,धनगर समाज कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य) आदींसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना मा. डॉ. गायकवाड म्हणाले की,पुढील पिढीचा जीवन मार्ग सुखकारक करण्यासाठी ज्या कार्याप्रती प्राध्यापक शिक्षक त्यांच्या अधिकाराने वेतन घेतात त्या वेतन प्रणालीला शोभेसे ज्ञान देण्याचे कार्य शिक्षक प्राध्यापकांनी केले पाहिजे. शिक्षण व्यवस्थेत केवळ तासिका घेणे तितकेच महत्वाचे नसून प्रात्यक्षिकांकडे जास्तीचे लक्ष असावे.  जीवनाच्या मार्गावर केवळ स्वतःपुरता परिवर्तनाचा विचार न करता तळागळातील समाजाच्या परिवर्तनाचा विचार करून आपले कार्य योग्य मार्गाने सातत्यपूर्वक कार्यरत ठेवावे.ज्ञानार्जन करताना आपल्या वर्गखोलीत असणाऱ्या विद्यार्थी संख्येवर लक्ष केंद्रित करून त्या विद्यार्थी संख्येबाबत चिंतन करावे, व विद्यार्थ्यांसोबत जिव्हाळा निर्माण करून त्यांना ज्ञान द्यावे. ज्ञानाने सक्षम असणाऱ्या व्यक्ती  देशाची दिशा ठरवू शकतात आणि ते सशक्त ज्ञान देण्याचे पवित्र कार्य शिक्षक-प्राध्यापक करतात याहून जीवनातील मोठे भाग्य दुसरे असू शकत नाही. योग्य प्रतीचे ज्ञानदान व बरोबरच सामाजिक आत्मभान घेऊन समाजाप्रती कार्य करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांचा, क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या नावाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन बीड जिल्हा मुप्टा  गेल्या बारा वर्षापासून कार्यकरते त्याबद्दल बीड जिल्हा मुक्ताचे अभिनंदन, या पुरस्कारामुळे कार्य करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांना पुढील कार्यासाठी बळ प्राप्त होईल, ज्या शिक्षक प्राध्यापकांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन, सोबतच पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याची सीमा रुंदावणार यावर शंका नाही, आणि त्या प्रतीचे कार्य पुढेही त्यांच्या हातून होत राहो, असे संबोधून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 बीड जिल्हा मुप्टा शिक्षक संघटनेच्यावतीने  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020  महाराष्ट्र राज्यातील एकूण  16 कृतिशील  शिक्षकांना देण्यात आला  याप्रसंगी  सर्व शिक्षकांना  परिवारासह  प्रमाणपत्र,  स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन  सन्मानित  करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रियदर्शी दिनदर्शीका चे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. विनोद किर्दक यांनी केले ,तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोहर सिरसाट यांनी केले. प्रसंगी महाराष्ट्र राज्यातून जिल्हा कमिटीचे  सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते, तर बीड जिल्हा मुक्ताचे मा. प्रा. राम गायकवाड, मा. प्राचार्य प्रदीप गाडे, मा. प्रा. राम गव्हाणे, मा. शरद मगर, मा. शाहेद कादरी,मा. प्रवीण तरकसे, मा. प्रा. बाळासाहेब गव्हाणे, मा. श्रीकांत वारभुवन,मा. शेख अजीज राजा, मा. शैलेश चिलवंत आदींसह इतर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुलसी शैक्षणिक समूहाचे सर्व कर्मचारी,बीड जिल्हा मुप्टा संघटनाचे सर्व सदस्य व पदाधिकारी,प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था चे सर्व सदस्य पदाधिकारी व मुक्ता शिक्षक संघटना प्रेमी सर्व मित्र परिवार उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.

No comments