Breaking News

सिध्देश्वर संस्थानच्या गाईसाठी घृष्णेश्वराचा चारा

भारत पानसंबळ । शिरूर कासार

येथील धाकटी अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या सिध्देश्वर संस्थानवर गोशाळेत असलेल्या गाईसाठी दोन घास चारा मिळावा म्हणून बोधेगांवच्या घृष्णेश्वर अर्बन कडून मदतीचा हातभार लावुन गाईप्रती असलेला भाव दाखवुन दिला .चा-यासाठी घृष्णेश्वर कडून चारा विकत घेण्यासाठी रोख रक्कम महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे कडे सुपूर्द केली.


तालुक्यात सर्वदुर प्रसिध्दिस असलेले सिध्देश्वर संस्थान आता धाकटी अलंकापुरी म्हणून ओळखले जात आहे ,या संस्थानवर विवेकानंद शास्त्री वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे ,शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक व संगीत शिक्षण देऊन मुलांना संस्कारीत करण्यासाठी निवासी व्यवस्था करून त्यांना धडे दिले जात आहेत ,याबरोबर" गोठ्यात गाय आणि घरात माय " याप्रमाणे आपल्या संस्थानवर गोशाळेच्या माध्यमातून गायीचे संगोपन केले जाते ,संस्थानला जमीन नसली तरी गोभक्तांच्या दानातुन त्यांचे संगोपन केले जात आहे ,वेळप्रसंगी किर्तन ,प्रवचन माध्यमातुन मिळत असलेल्या भिक्षेतून गायींना चारा विकत घेउन त्यांना भरवला जातो.

 मात्र गेल्या काही महिण्यापासुन "कोरोना " महामारी मुळे गर्दी टाळण्यासाठी किर्तन बंद असल्याने अर्थिक झळ सोसावी लागली अशा परिस्थितीत गाईंना सांभाळ करतांना मोठी कसरत करावी लागली त्यातच घृष्णेश्वर च्या बोधेगाव येथे शाखा स्थापणेच्या शुभारंभासाठी विवेकानंद शास्त्री यांना निमंत्रीत केले होते ,उदघापन प्रसंगी शास्त्री नी गोशाळेसाठी योगदान अशा आशयाचे आवाहन केले होते त्यावेळी घृष्णेश्वर ने दिलेला शब्द पाळत चारा मदतनिधी महंताकडे सुपुर्त करून हातभार लावला.

मदत निधी सुपुर्त प्रसंगी बोधेगांवचे अशोक महाराज ईलग शास्त्री ,रामदास महाराज ,रामजी केसभट सह घृष्णेश्वर चे भगवान फुंदे ,सुरेश ढाकणे ,रूस्तुम दौंड ,आदि उपस्थित होते .दिलेल्या योगदानाबद्दल विवेकानंद शास्त्री यांनी ऋण व्यक्त करत सर्वांनी धर्म कार्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले व घर तिथे एक तरी गाय सांभाळण्याचेही सांगीतले. 


No comments