Breaking News

समाज कल्याण सहा. आयुक्त बीड यांनी भंगाराच्या भावात महापुरुषांच्या प्रतिमांसह इतर साहित्य विकले -संतोष जोगदंड

बीड : गेल्या काही महिन्यांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील समाज कल्याण आयुक्त बीड हे वादाच्या भोवर्‍यात असता आणखीन एक प्रकार या ठिकाणी घडला  महापुरुषांच्या प्रतिमा भंगारा विकल्याचे  निदर्शनास आलं आहे. व महात्‍मा ज्योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेची विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे.

 सामाजिक न्याय मंत्री तथा पालक मंत्री यांचे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी समाज कल्याण आयुक्त बीड यांनी कार्यालयातील आरडी असो की फर्निचर यांची कुठलीही निविदा न काढता भंगाराच्या भावात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाही यावर माननीय बीड जिल्हाधिकारी तसेच सामाजिक न्याय मंत्री यांनी दखल घेणे आवश्यक होते परंतु त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून समाज कल्याण आयुक्त बीड यांना पाठीशी घालत असल्याचे वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांनी म्हटले आहे.

भंगारच्या भावांमध्ये रद्दी फर्निचर विकत असताना यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेले महापुरुषांचे फोटो प्रतिमा यांची ची तोडफोड करून त्यांना अवमानित केला असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला या सर्व गंभीर बाबीचा विचार होणे आवश्यक असून समाज कल्याण आयुक्त बीड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे या आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत समाज कल्याण मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे कळवले आहे. No comments