Breaking News

विनयभंग प्रकरणी आरोपीला जामिन - ऍड. तेजस नेहरकर


बीड : घरात एकटीस गाठून तू मला आवडतेस माझ्या सोबत लग्न कर असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपीला जामीन मंजूर केल्याची माहिती ऍड. तेजस नेहरकर यांनी दिली.

नेकनूर पोलिस ठाण्यात सावंत यांच्या विरुद्ध  १० जानेवारी २०२१ रोजी कलम ३५४, ३५४ (ड), ४५२, ५०७ भारतीय दंड संहिता १८६० नुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपीच्या वतीने ऍड. तेजस नेहरकर यांनी भक्कमपणे बाजू मांडून युक्तिवाद केल्यामुळे विनयभंग प्रकरणी गंभीर आरोपातून न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या जामीन प्रकरणी नेकनूर, पाटोदा या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. याप्रकरणी ऍड. तेजस नेहरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments