Breaking News

शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर क्रीडा शिक्षक सुरवसे यांचे उपोषण मागे


परळी वैजनाथ : श्री सरस्वती विद्यालयातील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांचे आपल्यासोबत होणारे नेहमीचे गैरवर्तन थांबवावे तसेच सर्व शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी सुरू केलेले उपोषण रविवार दि.17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बीडचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांच्या सोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे.

रामकिसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे, शाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचार्‍यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचार्‍यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचार्‍यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचार्‍यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत. 

क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे मागील चार दिवसापासून उपोषणावर असून त्यांचे प्रकृती बिघडली होती. या उपोषणाची आज 17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बीडचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी दखल घेवून उपोषणस्थळी सुरवसे यांच्याशी संवाद साधला. आपल्या सर्व प्रश्नांवर आपण एकत्र बसून चर्चा करूत, तुम्ही बीडला या, आपण मार्ग काढूत असे आश्वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिल्यानंतर सुरवसे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

No comments