प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी एआयएमआयएम पक्षाच्या मुख्य कार्यालयात उपस्थित रहावे - हॅरिसन रेड्डी, अय्युब पठाण
बीड : येत्या २६ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बशीरगंज येथील हॉटेल आशियाना समोर एआयएमआयएम पक्षाच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हाभरातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन पक्षाचे माजी प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी आणि जिल्हा सरचिटणीस हाजी अय्युब खान पठाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, दरवर्षी पक्षातर्फे प्रत्येक राष्ट्रीय सणादिवशी पक्ष कार्यालयात आपल्या देशाचे प्रतीक असलेला तिरंगा झेंडा फडकावून झेंडा वंदन केले जाते. या प्रथेप्रमाणे यावेळीही २६ जानेवारी रोजी पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ८.३० वाजता जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ यांच्या हस्ते झेंडा फडकावून सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे या वेळीही पक्षाचे जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन एआयएमआयएम पक्षाचे माजी प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी आणि जिल्हा सरचिटणीस अय्युब खान पठाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
No comments