Breaking News

विभाग नियंत्रक जगनोर याच्यावर निलंबनाची कारवाई करा - बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे

बीड :  21 जानेवारी एस टी महामंडळ बीड नियंत्रक विभागातील अधिकारी जगनोर हे महामंडळातील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देत आहेत अनेक कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी आहेत.


मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यावर जाणून-बुजून खोटे आरोप करून 353 चा गुन्हा दाखल केला जातो या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येतो. तसेच अशा बेजाबदार राजनोर चे तात्काळ निलंबन करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


No comments