Breaking News

केज पोलिसांनी केला दारू बंदीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट

गौतम बचुटे । केज 

अनेक वर्षांपासून केज पोलीस स्टेशनला दारू बंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल न्यायालाय आणि पोलीस अधीक्षक आर राजास्वामी यांच्या आदेशाने नष्ट करण्यात आला.


या बाबतची माहिती अशी की, सन २०१७ पासून केज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणी १ हजार रु. पेक्षा जास्त किंमतीचा ३७ वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त केलेला एकूण २ लाख १५ हजार ५७६ रु. किंमतीचे देशी व विदेशी बनावटीच्या मुद्देमाल हा केज पोलिसांच्या ताब्यात होता. सदर मुद्देमाल हा ज्या गुन्ह्यात जप्त आहे; त्याचे न्यायालयाच्या समरी हस्तगत करून मा. न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना पत्राद्वारे कळविण्यात आले. 


या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आदेश प्राप्त होताच दि.१२ जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा सर्व मुद्देमाल केज पोलीस स्टेशनच्या आवारातील रिकाम्या जागेत नेऊन तो पंचासमक्ष नष्ट केला. या प्रसंगी केज पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन तसेच साहाय्य पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ लांडगे, कादरी, अशोक नामदास, हनुमंत चादर यांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे योग्य ती तजविज ठेऊन मुद्देमाल नष्ट केला.
No comments