Breaking News

आपच्या आंदोलनाकडे नगरपरिषद-प्रशासनाचे दुर्लक्ष; स्थानिकांचा संताप अनावर

बीड :  सलग तिसऱ्या दिवशी देखील आम आदमी पार्टीचे इमामपूर येथील रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आज दिवसभरात शहरातील सुजाण नागरिकांनी भेटी देत या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
काम सुरू होत नसल्याने नगरपरिषद व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली असून येत्या निवडणुकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व स्थानिक आमदारांना या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे यांनी भेट देत या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.


No comments