Breaking News

आष्टी युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे आ रोहित पवार यांच्या हस्ते प्रकाशन


आष्टी : तालुक्यात सतत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा नेते तथा जामखेड कर्जतचे आ.रोहित (दादा) पवार यांच्या हस्ते कर्जत येथे करण्यात आले यावेळी बोलताना आ पवार म्हणाले की आष्टी तालुका युवा पत्रकार संघ  सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब व विद्यार्थी यांना सतत मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहून सामाजिक उपक्रम राबवित असून त्यामुळे या संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी प्रकाशनवेळी बोलताना सांगितले. 

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष निसार शेख,जावेद पठाण,तुकाराम भवर, संतोष नागरगोजे,अक्षय विधाते,रा काँ पार्टी कर्जत युवक तालुकाध्यक्ष नितिन धांडे, पत्रकार मच्छिंद्र अनारसे आदी दिसत आहेत.

No comments