Breaking News

परळीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात : विविध क्षेत्रातील महिलांचा केला गुणगौरव

परळी : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या परळी शहराध्यक्ष अर्चना रोडे यांनी दिली आहे.

सामाजिक न्यायमंत्री ना धनंजय मुंडे व परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक आन्ना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व परळीच्या नगराध्यक्ष सौ सरोजनीताई हालगे यांच्या अध्यक्षतेखाली परळी शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये डॉ.स्वर्णा टिंबे मॅडम, परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या इन्चार्ज सिस्टर सौ निता मगरे मॅडम, शहर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी सौ.सुनिता नरगलकर मॕडम यांचा सत्कार करुन गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी जिजाऊ यांच्या वेशभूषेत प्राची पंचाक्षरी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत सई जोशी साक्षी जोशी यांनी वेशभुषा प्रदान केल्यांने कार्यक्रमाच आकर्षण ठरल्या होत्या. या बाल कलाकरांना शालेय साहित्य मिटाई भरवुन सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय माता जिजाऊ यांच्या जयंतीचे आयोजन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने परळीत शहराध्यक्ष अर्चना रोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला अन्नपूर्णा ताई जाधव चित्रा देशपांडे,उमा धुमाळ बोडके ताई महानंदा धायगुडे कोमल ग्रुप कर पुष्पा पोट विजया पांडे अशा गजापूर संगीता काळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्चना रोडे यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली रोडे यांनी केले.
No comments