Breaking News

आम आदमी पार्टीकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक चकाचक


सलग तिसऱ्या रविवारी आप'ने बीड शहरात राबविले स्वच्छता अभियान

बीड : येथील नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराचा बुरखा फाडण्याचे काम सलग तिसऱ्या रविवारी देखील आम आदमी पार्टीकडून सुरू असून रविवार दि 10 जानेवारी रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसर स्वच्छ करण्यात आला. नगरपरिषद स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या नावाखाली काहीही करत नसल्याचे आम आदमी पार्टीने हे वेळोवेळी बीडकरांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

   आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करताना म्हणाले की, नगरपरिषद ही केवळ क्षीरसागर कुटुंबियांच्या सुचनांवरून चालत असून त्यांना बीडकरांचे काहीएक देणेघेणे राहिलेले नाही. आप प्रत्येक रविवारी बीड नगरपरिषदेच्या अस्वच्छ कारभाराला असेच बीडकरांच्या समोर आणणार आहे. सुजाण बीडकरांनी स्वतःहून या अभियानात सहभागी व्हावे असेही आवाहन अशोक येडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले जिल्हा सचिव, प्रा ज्ञाणेश्वर राऊत जिल्हा सघटन मंत्री, सय्यद सादेक शहर प्रमुख, मिलिंद पाळणे शहर सचिव, रामभाऊ शेरकर मिडिया प्रमुख, प्रा संदिप गाडगे, ईश्र्वरजी आमटे, उमेश मेखे, स्वपणिल गायकवाड, योगेश पवळ आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


No comments