Breaking News

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढविण्याची गरज-मा.आ.डी.के.देशमुख


मराठवाडा जनता विकास परिषदेचे शिष्टमंडळ घेणार जिल्हाधिकारी यांची भेट

बीड :  बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढविण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख यांनी केले.माजी आ.डी.के.देशमुख मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत बोलत होते. याप्रसंगी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगवान, केंद्रीय शहरसचिव प्रा.डॉ.डी.एच.थोरात, जिल्हा सचिव सुमंत गायकवाड, अविनाश वाघीरकर, शिरीष देशमुख यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डी.के.देशमुख म्हणाले की, परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग 262 कि.मी.चे रेल्वे मार्ग आहे. सन 1997-98 ला मंजुरी मिळालेला रेल्वेमार्ग 22 वर्षातही पुर्ण झाला नाही. ही रेल्वेमार्ग महाराष्ट्र आणि भारत सरकार यांच्या संयुक्त भागीदारीत आहे. यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेचे शिष्टमंडळ ही जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेणार असल्याचे सांगितले या बैठकीत सोलापूर-बीड-जालना सोलापुर रेल्वे मार्गासह अनेक ठराव मंजुर करण्यात आले.
तमाशा कलावंत महिलांच्या मुलांसाठी सेवा आश्रम चालविणार्‍या सौ.मयुरीताई राजहंस यांना औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा डॉ.रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल राजहंस पती-पत्नीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीला सुहास काटे, सौ.मयुरी राजहंस, सुरेश राजहंस, सुहास देशमुख, जगदीश जाजु, डी.डी.औटी, सदाशिव कुडके उपस्थित होते. बैठकीचा समारोप बीड जिल्हा सचिव सुमंत गायकवाड यांच्या आभाराने झाला.

No comments