Breaking News

वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलिन


आष्टी : 
आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील वीर जवान शरद दत्तोबा चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर आपल्या लोणी सय्यदमीर या गावी आले होते. सोमवारी (ता.१८) सायंकाळी ९ च्या सुमारास मोटारसायकल घेऊन बाहेर जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला धडकल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात लोणी सय्यदमीर येथे शनिवारी (ता.२३) अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद चांदगुडे हे २००४ मध्ये अहमदनगर येथे फौजमध्ये भरती झाले होते. भरती झाल्यानंतर त्यांनी जम्मू, राजस्थान, बेळगाव, पंजाब येथे आपले कर्तव्य निभावले होते. शरद चांदगुडे हे एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. सोमवारी (ता.१८) उशिरा काही कामानिमित्ताने ते दुचाकी घेऊन बाहेर जात असताना अंधार असल्याने रस्त्याच्या बाजूच्या वृक्षाला धडक बसली होती. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना प्रथम अहमदनगर व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाले. वीर जवान शरद चांदगुडे यांचे पार्थिव लोणी सय्यदमीर येथे येताच भारत माता की जय, जय जवान जय किसान, अमर रहे अमर रहे शरद चांदगुडे अमर रहे आशा घोषणांनी दणाणले होते. त्यांच्यावर शनिवारी (२३) सायंकाळी ७ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आर्मी व पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. वीर जवान शरद चांदगुडे यांना आई, वडील, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, जयदत्त धस, तहसीलदार शारदा दळवी, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, आर्मीचे अधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद यांचे बंधू बाळासाहेब चांदगुडे हे ही फौजमध्ये कार्यरत आहेत.








No comments