Breaking News

साबलखेडमध्ये शेतकऱ्यांना ई- पिक पाहणी प्रक्लपाचे मार्गदर्शन


कडा  : आष्टी तालुक्यातील धानोरा सज्जाचे तलाठी अनिल ठाकरे यांनी सोमवार दि.११ रोजी साबलखेड येथे शेतकर्‍यांचा छोटे खानी कार्यक्रम घेवून ई- पिक पाहणी प्रक्लपाची माहिती देवून यामधून होणारे फायदे व तोटे समजावून सांगितले.

ई-पिक पाहणी  प्रकल्पाच्या माध्यामातून शेतकर्‍यांची दरवर्षी खरीप, रब्बी हंगाम पिकांची नोंदणी केली जाते.  त्यांना तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागतात यासाठी शेतकर्‍यांनी या प्रकल्पासाठीचे मोबाईल अॅप डाउनलोड करुन त्यावर नाव नोंदणी करण्याचे मार्गदर्शन केले.या डाउनलोड अॅप मुळे फायदे काय होतील. याचे महत्त्व समजावून सांगत २० जानेवारी पर्यंत ई-पिक पेरा रब्बीचा आॅनलाईन करण्याचे आव्हाण केले. 

यामध्ये शेतकर्‍यांनी या अॅप बद्ल पिकाची नोंदणी कशी करावी आपल्या शेतातील कोण कोणत्या पिकाची नोंद घेता येईल, पिकाची नोंद केल्याने होणारे फायदे व तोटे समजावून सांगितले तसेच बांधावर झाडे, सिंचनाचे साधणे, घरपड, वस्तीपड याची पण कशी नोंद करता येईल हे आपण अॅप द्वारे केल्याने प्रशासनाकडे नोंदीसाठी गरज पडणार नाही यामधून शासनाचे मिळणारे मिळकत व नुकसान भरपाई सोपी जाणार असे म्हत्व धानोरा सज्जाचे तलाठी अनिल ठाकरे यांनी सांगितले. या प्रसंगी सरपंच शरद ( काका ) देसाई, बाबासाहेब साबळे, बाबासाहेब जाधव, विकास देसाई, अशोक देसाई, अमोल देसाई, नवनाथ वि.देसाई, प्रल्हाद पोकळे, शेतकरी तसेच तरुण शेतकरी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments