Breaking News

परळीत विना मास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई


परळी :  नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी परळी शहर पोलिसांच्या वतीने  वाहनचालकांवर कारवाईचा धडाका लावण्यात आला. शहरातील चौकाचौकात थांबून पोलिसांनी विनामास्क फिरणारे, मोटारसायकल चालक, विनाहेल्मेट फिरणे, सिटबेल्ट न लावणे, गाडीला नंबर फलक नसणे तसेच ड्रायव्हींग लायसन्स नसणार्‍या वाहचालकांवर कारवाई केली.

वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दुपारच्या सुमारास शिवाजी चौक, एकमिनार चौक, उड्डाणपुल तर सायंकाळच्या सुमारास नेहरू चौक (तळ) भागांतील वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. न्यायालयाने वाहतूकीचे घालून दिलेले नियम न पाळणार्‍या वाहनचालकांना पोलिसांच्या वतीने दंड आकारण्यात आला. बर्‍याच वाहनांना नंबर प्लेट नसणे,दादा,मामा,नाना असे फँन्सी नंबर असणे, विनामास्क प्रवास करणे, ड्रायव्हींग लायसन्स न बाळगता गाड्या चालवणे,  चारचाकी गाडीतून प्रवास करतांना सिटबेल्ट न लावणे आदींसारख्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. सदरील कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी  क्षीरसागर व मराडे व rcp पथकाचे कर्मचारी यांनी मिळून कारवाई केली.

No comments