Breaking News

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ लोकशाहीवादी पक्ष संघटनांची बीडमध्ये एकत्र ट्रॅक्टर तिरंगा रॅली

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा-  प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड : दिल्लीच्या सिंघु बोर्डवर शेतकरी व कामगार विरोधी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या सर्थनात बीडमध्ये लोकशाहीवादी पक्ष संघटनांची एकत्रितरीत्या ट्रॅक्टर तिरंगा रॅली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात येवून शेतकरी आंदोलनास आपला पाठींबा असल्याचे शेतकरी संघर्ष समितीच्या प्रा. सुशीलाताई मोराळे यावेळी म्हणाल्या.   

गेल्या 57 दिवसांपासून शेतकरी विरोधी तीन कायदे व कामगार विरोधी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. परंतु केंद्राचे सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. मोदींनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा न बनवता समाधानकारक तोडगा काढण्याची गरज आहे. हाडे गोठवणारी थंडी, पाऊस धारा अशा संकटाचा सामना पंजाब- हरियाणा- दिल्लीचे शेतकरी करीत आहेत. एमएसपीचे शेतकऱ्यांना असलेले संरक्षण या कायद्यामुळे रद्द होणार आहे. देशात 85 टक्के शेतकरी दोन एकराच्या आतले आहेत. त्यांना करार पद्धतीने भांडवलदारांना शेती देणे परवडणारे नाही. या कायद्याने साठेबाजीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे कृत्रिम अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याचे संरक्षण या कायद्याने समाप्त होणार आहे. सरकारची देहबोली अत्यंत चुकीचे आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार आहेत.

एकदा शेती भांडवलदारांच्या विळख्यात गेले की, शेतकरी बरबाद होणार आणि तो शेतमजूर होणार असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. कामगारांचे संरक्षण या कामगार विरोधी कायद्यामुळे रद्द होऊन लाखोच्या संख्येने कामगार बेरोजगार होणार आहेत. सरकारने सार्वजनिक उद्योगाची खासगीकरणाचा  सपाटा लावला आहे.

"मै देश बिकने नही दूंगा" अशा थापा मारून देशा ऐवजी  देशातील उद्योगधंदे सरकारने विक्री करायला सुरुवात केली आहे. पूर्णपणे संघाच्या प्रतिगामी अजेंडा राबविण्याचे काम सरकार करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना या कायद्याच्या दुष्परिणाम समजल्या आहेत ते जीवाची पर्वा न करता लढत आहेत. सीमेवर थंडीमुळे जवळपास 90 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू नैसर्गिक नसून ही शेतकऱ्यांची हत्याच आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मदतीला जाणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समिती संयुक्त किसान मोर्चा व शेतकरी संघर्ष समिती सह बीड जिल्ह्यातील तमाम पुरोगामी लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी एकत्र येऊन या आंदोलनास पाठिंबा दिला असल्यामुळे आजची ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. सरकारने तत्काळ रद्द करावे असे आव्हान प्राध्यापक सुशीला मोराळे प्राध्यापक पंडित दादासाहेब मुंडे महादेव नागरगोजे गणेश ढाकणे बबन आंधळे जाधव कमलबाई वंजारी महासंघाचे मोहागाव अमोल राठोड गजानन ससाने दत्ता दत्ता जाधव युवा उद्योजक संघ अध्यक्ष नागेश मीठे पाटील आदींनी केले आहे.No comments