Breaking News

शुभविवाह अन निकाह सोशल संस्थेच्या सदस्यपदी शेख रेहान


बीड :  शुभविवाह अन निकाह सोशल संस्था बीड कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात शेख रेहान फेरोज यांना संस्था अध्यक्ष आय.एम.काजी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सय्यद शहेंशाह अहेमद हे होते, नियुक्तीपत्र स्विकारुन शेख रेहान यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, मी समाजातील अनाथ, विधवा महिलांच्या लग्नासाठी व गोरगरीब मुला-मुलींचे लग्न जमवण्यासाठी प्रयत्नशील राहील, हे स्वर्गरुपी कार्य आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी संस्था अध्यक्षांचे आभारी असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सय्यद शोएब-उज-जमा यांनी केले तर आभार सय्यद कैसर अहेमद यांनी मानले.


No comments