Breaking News

राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंदाचे कार्य प्रेरणादायी - प्रा.डॉ.चव्हाण

 


परळी (वै.)  : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत प्रा. डॉ.बी.आर.चव्हाण यांनी व्यक्त केले.

       पुढे बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले की, आजच्या युवकांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे. नियोजनबद्ध आखणी, वास्तविकता व ध्येयप्राप्ती अशा अनेक महत्वपूर्ण बाबी त्यांच्यापासून शिकता येतील. आजच्या युवकांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान अभ्यासणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य सुनील लोमटे हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री अजय सोळंके सर व प्रा.श्री.राजू कोकलगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.        

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एम. सोळंके यांनी तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.अंकुश वाघमारे यांनी केले. आभार प्रा.बी.एल. देशमुख यांनी मानले. यावेळी न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments