Breaking News

निष्ठेचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे वाल्मिक अण्णा!

 

रथाचा सारथी हुशार आणि चालाख असेल तर हरलेले युध्दही जिंकता येते, आपले ध्येय अल्पावधीत यशस्वीरित्या गाठता येते. हा इतिहास आहे. महाभारतातही श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले म्हणून पांडव विजयी झाले तर सात्यकी या सारथ्याने कर्णाचे खच्चीकरण केले म्हणुन त्याचा पराभव झाला. सांगायचे एवढेच की सहकारी जीवाचे आणि कोणत्याही प्रसंगात साथ देणारे असतील तर माणुस हमखास यशस्वी होतो. शेकडो झिलकऱ्यांपेक्षा जीवाला जीव देणारे मोजकेच सहकारी असावेत असे अध्यात्म आणि इतिहास सांगतो. केवळ आणि केवळ कृष्णाच्या सारथ्य कलेमुळे अर्जुनाचा अनेकदा प्राण वाचला. कृष्ण, सुदामा, रामभक्त हनुमान अशा ऐतिहासिक एकनिष्ठ भक्त, मित्र अशा सर्वच व्याख्येत तंतोतंत बसणारे व्यक्तीमत्व म्हणजे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे जिवश्च - कंठश्च स्नेही, सहकारी, सखा, कार्यकर्ता असे नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड... पडद्यामागचे खरेखुरे सुत्रधार म्हणजे वाल्मीक अण्णा... पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या यशामागे वाल्मीक अण्णा यांचा सहभाग अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. धनंजय यांच्या परस्पर प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन वाल्मीक अण्णा यशस्वीरित्या पार पाडतात.

      ना.धनंजय मुंडे यांच्या राजकारणातील उद्यापासून ते आजतागायत वाल्मीक अण्णा अगदी सावलीसारखे सोबत आहेत. सावली तरी अंधारात साथ सोडते पण वाल्मीक अण्णांनी कोणत्याही प्रसंगात ना.धनंजय यांची साथ सोडली नाही. निष्ठा कशी असावी तर वाल्मीक अण्णासारखीच असावी. सध्याच्या स्वार्थासाठी निष्ठा गहाण ठेवली जाणार्‍या जमान्यात निष्ठेचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून वाल्मीक अण्णा कराड यांच्याकडे बघितले जाते. विशेष म्हणजे काही तरी मिळेल या आशेने नाही तर आपण कुणाला तरी काही तरी देऊ या उदात्त भावणेने त्यांची निष्ठा आहे. बेईमान लोकांच्या गोतावळ्यात कुणावर कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न पडत असताना ज्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन बिनधास्त राहावे असा विश्वासाचा खांदा म्हणजे वाल्मीक अण्णा...

     आपल्या संगठन आणि कल्पकतेची चुणूक वाल्मीक अण्णा यांनी युतीच्या काळात दाखवून दिली. ना.धनंजय मुंडे यांनी राजकारणात सक्रिय होण्यासाठी जिल्ह्यात एक रथयात्रा काढली होती. तिचे अतिशय नेटके आणि सुरेख नियोजन वाल्मीक अण्णा यांनी केले होते. संपूर्ण बीड जिल्ह्य़ातील विविध भागात जाऊन ना.धनंजय मुंडे यांनी जनतेशी संवाद साधला होता. तेंव्हाच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला आणि नेपथ्य अर्थातच वाल्मीक अण्णा यांच्या हती. तेंव्हापासून वाल्मीक अण्णांनी नेपथ्यावर कायम प्रभूत्व ठेवले आहे. स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणाची अघोषित जबाबदारी वाल्मीकअणांकडे सोपवली. जिकीरीचे आणि जोखमीचे काम असले की साहेब आणि अण्णा दोघांची पसंती असायची ती वाल्मीक कराड... या विश्वासाला वाल्मीक अण्णांनीही कधीच तडा जाऊ दिला नाही. वाट्टेल ती किंमत मोजून किंवा कोणताही त्याग करून नाही जमेल तो मार्ग वापरून वाल्मीक कणांनी सोपवलेले काम यशस्वी केले. दगडालाही टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही तसेच इथपर्यंत येण्यासाठी वाल्मीक अण्णांनीही आनेक घाव सहन केले आहेत. नव्हे प्रसंगी स्वतः चा जीवही धोक्यात घातला आहे. विशेष म्हणजे अनेकांनी त्यांच्या चहाड्या - चुगल्या करून वाल्मीक अण्णांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यात बर्‍याचजणांना काही प्रमाणात यश आल्यासारखे वाटायचे पण थोड्याच दिवसात सत्य समोर यायचे आणि वाल्मीक अण्णा पुन्हा आपल्या स्थानावर भक्कम असायचे. त्यांच्यावर वहिनी (प्रज्ञाताई) आणि बाई (रूक्मीणबाई) यांचा विशेष विश्वास होता. त्यातही बाईंचा अधिक जीव होता आणि सध्याही आहे. ना.धनंजय मुंडे कुठेही जात असतील तर "वाल्मीक सोबत आहे ना" याची खात्री पटल्याशिवाय बाई स्वस्थ बसत नसत.

      ना.धनंजय मुंडे यांनी कोणताही कार्यक्रम हाती घेतला की तो यशस्वी करण्यासाठी वाल्मीक अण्णा जीवतोडून प्रयत्न करायचे. ना.धनंजय मुंडे यांच्या राजकारणाच्या सुरूवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सभांचे नियोजन त्यांच्याकडे असायचे तेंव्हाही वाल्मीक अण्णा एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजवेल असे नियोजन करायचे आणि आता पडद्यामागचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणुनच त्यांना ओळखले जाऊ लागले आहे. सहकाऱ्यांसाठी त्याग करावा तो त्यांनीच! आपल्याला काही तरी मिळावे म्हणून नाही आपल्या सहकाऱ्यांना न्याय आणि सन्मान मिळावा यासाठी ते सतत काम करीत असतात. सुरुवातीला क्रिकेट स्पर्धा आणि नंतर सामुदायिक विवाह सोहळा हे दोन्ही यशस्वी करण्यात वाल्मीक अण्णांचा सिंहाचा वाटा... विशेष म्हणजे केलेल्या कामाचे श्रेय त्यांनी कधीच घेतले नाही. पण केलेले काम झाकत नाही हेही तितकेच सत्य आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून धनंजय मुंडे यांनी पुण्याच्या धर्तीवर परळी फेस्टिव्हल सुरू केला आणि आपले नेपथ्य दाखवण्याची संधी पुन्हा एकदा वाल्मीक अण्णांना मिळाली. खरे तर खुद्द मुंडे साहेब आणि पंडितअण्णा या दोघांच्या तालमीत वाल्मीक अण्णांचं व्यक्तीमत्व अगदी ताऊन सुलाखून निघाले आहे. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व आपण जपले पाहिजे. नेतृत्वशी एक निष्ठ कसे असे याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे वाल्मिक अण्णा या शुभदिनी अण्णा आपणांस उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना.

लेखक

मोहन साखरे


No comments