Breaking News

राजुरीत विद्यार्थ्यांसाठी 'गजानन' पॅटर्न : विद्यालयाचे प्राचार्य केशव भांगे यांचा गुणवता वाढीसाठी प्रथमच प्रयोग


राजुरी नवगण : कोरोना महामारीच्या संकटात  विद्यार्थ्यांचे  खूप नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयाचे प्राचार्य केशव भांगे यांनी गजानन पॅटर्न राबवून या अंतर्गत पंधरा दिवसाला झालेल्या अभ्यासावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्याकंन केले जात आहे. यामुळे गुणवत्ता वाढीत भर पडत आहे.


कोरोना महामारीच्या संकटाने उदभवलेल्या लॉकडाऊनमुळे  विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या काळात ग्रामीण भागातील मुले  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावली होती. परंतु कशीबशी शासनाने इयत्ता ८ वि ते १२ शाळा सुरु केल्या.


परंतु झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी  कमी पड्तायेत हे लक्षात येताच राजुरी येथील गजानन शाळेचे प्राचार्य केशव भांगे यांनी दर पंधरा दिवसाला झालेल्या अभ्यासावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मुल्याकंन करण्यावर भर दिला आहे.  या उपक्रमास प्राचार्य भांगे यांनी गजानन पॅटर्न असे नाव दिले आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे असून विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा पॅटर्न महत्वाचा ठरत आहे.


No comments