Breaking News

शेतकरी नेते पाशा पटेलांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक कोटी बांबू लागवडीच्या मोहीमेला पाटोदा तालुक्यातून केली सुरुवात


गो. मा.  खोरे संवर्धन अभियानांतर्गत गवळवाडी येथील मांजरा उगमस्थानी 11 बांबू झाडांचे रोपण 

बीड : मराठवाड्यातील मांजरा आणि गोदावरी नदीकाठाला बांबूची एक कोटी झाडे लावण्याच्या शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या गोमा खोरे संवर्धन मोहीमेला नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथे मांजरा नदीच्या उगमाच्या ठिकाणी आज शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या हस्ते बांबूची लागवड करून या मोहीमेचा श्री गणेशा झाला. 

    


येत्या पाच वर्षात मांजरा आणि गोदावरी  नदीच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड केली जाणार असून यामुळे पर्यावरणाला मोठा फायदा होणार असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले येत्या काळात बांबूची मोठ्या प्रमाणात मागणी होत असून बांबू हे सर्व उपयोगी झाड असल्याकारणाने तसेच ऑक्सीजन निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते तसेच नदीपात्राच्या विद्रुपीकरण नदी संवर्धन आणि वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही पटेल यांनी सांगितले. एका शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये उत्पन्न बांबू शेतीतून उपलब्ध होऊ शकते असे देखील पटेल यांनी मांडणी करून शेतकऱ्यांना सांगीतले.

 यावेळी बीड शहराचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, पंचायत समितीचे सभापती लांबरुंड, चंद्रकांत फड, माजी सभापती किरण बांगर, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, राजेभाऊ देशमुख,उदयसिंह देशमुख,दत्ता जाधव, धनंजय गुंदेकर, सरपंच घोळवे, उपसरपंच सोंडगे यांच्यासह गवळवाडी गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments