Breaking News

बर्ड फ्लू ; घाबरु नका, काळजी घ्या, पक्षी मयत झाल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा : जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांचे आवाहन

गेवराई :  बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव याठिकाणी 'बर्ड फ्ल्यू'चे संक्रमण होऊन कोंबड्या दगावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये व बर्ड फ्लू चा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, तसेच कुक्कुटपालकांनी पक्षी मयत झाल्यास तात्काळ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कुक्कुटपालक, दुकानदार तसेच नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी केले आहे. 

   अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव याठिकाणी बर्ड फ्लू ने कोंबड्या दगावल्याचे निदर्शनास आल्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान जिल्ह्यात इतर ठिकाणी या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुटपालकांनी घाबरून न जाता सतर्क रहाणे गरजेचे आहे. आपल्या पक्षांना नियमित उपचार करणे, खाद्यसुरक्षा, लसीकरण, मलमूत्र व व्यवस्थापन, वाहतूक व सुरक्षा करणे आवश्यक आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, पक्षी मृत्यूमुखी आढळून आल्यास नागरिकांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला तातडीने माहिती द्यावी. कुक्कुटपालकांनी कुक्कुटपालन शेड व परिसरात स्वच्छता राखावी तसेच शेडचे सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून निर्जंतुकीकरण करावे. 


कुक्कुटपालकांनी आपल्या पक्षाचा स्थलांतरित पक्षांची संपर्क टाळावा. पक्ष्यांना रोज ज्या भांड्यात खाणे दिले जाते, अशी भांडी रोज पावडरने स्वच्छ धुवावीत. एखादा पक्षी मरण पावला तर त्याला उघड्या हाताने स्पर्श न करता ग्लोजचा वापर करुन हात सतत साबन अथवा हँडवाँशने स्वच्छ धुत रहावे. पक्षी मृत किंवा सुस्त दिसल्यास त्याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना कळवा. पक्षांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा. आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येवू नका. पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवा. व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच अंडी, चिकन खाण्यामुळे बर्ड फ्लू चा धोका आहे, या अफवेवर विश्वास ठेवू नये. मात्र चिकन, अंडी विक्रेत्यांनी ग्लोज व मास्कचा वापर करावा. तर नागरिकांनी देखील चिकन, अंडी शिजवताना ग्लोज तसेच तोंडाला मास्क ठेवावे, यानंतर वापरलेल्या मास्क, ग्लोजची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.

No comments