Breaking News

मकरसंक्रांत निमित्त भगवाननगर भागात महिलांचा हळदी- कुंकवाचा कार्यक्रम संपन्न!

शिरुर कासार : मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने शहरात विविध भागात हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला वर्ग आयोजित करत आहे त्याच पार्श्वभूमीवरशहरातील भगवान नगर भागात सर्व महिलांनी एकत्रित येऊन हळदी- कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

मकरसंक्रात म्हणजे महिलांच्या आवडीचा सण प्रत्येक महिला एकमेकींना आपापल्या घरी किंवा सामुहीक हळदी -कुंकवाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करत संसार उपयोगी वस्तू भेट देवून कार्यक्रम संपन्न करत असतात यावेळी शहरातील विविध भागातील महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती हा कार्यक्रम भगवाननगर भागातील सर्व महिलानी एकत्र येऊन आयोजित केला होता.
No comments