Breaking News

कुंभार समाजाच्या थापटन मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा - संतोष गोरे


माजलगांव : कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि. ५ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर कुंभार समाजाचा धडक थापटन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या न्याय हक्काच्या विविध मागणीसाठी काढण्यात आलेल्या थापटन मोर्चात माजलगांव मधील समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कुंभार समाज संघटनेचे माजलगांव तालुका अध्यक्ष संतोष गोरे यांनी केले आहे. 

          कुंभार समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी दि.५ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या या थापटन मोर्चात खालील मागण्यांचा समावेश आहे यात प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॉरिस (पीओफी) वरील बंदी उठवावी, समाजाला दहा हाजार ईलेक्ट्रिक चाक शासनाने मोफत वाटप करावे,श्रीसंत गोरोबा काका महामंडळामार्फत समाजाला कर्ज वाटप करण्यात यावे ६० वर्षावरील कुंभार समाजाच्या कारागीरांना मासिक देण्यात यावे,सामाजिक, शैक्षणिक आशा विविध कुंभार समाजाच्या समस्या आहेत या सह विविध मागण्यांसाठी दि.५ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर कुंभार समाजाचा थापटन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी माजलगांव तालुक्यातील कुंभार समाजाच बांधवांनी लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे कुंभार समाजाचे माजलगांव तालुका अध्यक्ष संतोष गोरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे. 

No comments