Breaking News

माजलगावचे युवा सामजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


माजलगाव : सामाजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करुण ते भाजपाचे माजी पदाधिकारी होते. त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भविष्यात भाजपाला नुकसान होणार आहे. अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करुण समाजाच्या अनेक अडी आडचणी सोडविण्यासाठी राजु खुरेशी यांनी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, काढुन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजुभाई हे कायम सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम अग्रेसर असताना दिसत असतात. परंतु समाजिक चळवळीत काम करत आसताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण यापुढे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे प्रवेशा वेळी मत व्यक्त केले.

 

यावेळी उपस्थित कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती संभाजी शेजुळ साहेब, पंचायत समिति माजी सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती वसीम भैया मनसबदार, अँड भानुदास डक साहेब, नगरसेवक तोफीक भैय्या पटेल, युवा नेते सय्यद लतीफ भैय्या, युवक जिल्हाउपाध्यक्ष सलीम भाई, शेख इम्रान, सुल्तान मंन्सुरी, अल्ताफ मिर्जा, रफीक भैय्या, परवीन बाजी, लखन भैय्या थावरे, सचिन झगडे, मोईन खाँन, मोहसीन बागवान, सह अदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष बळकटी साठी दादांच्या भक्कम नेत्रत्वाखाली व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करेल व आपले सर्वांचे शुभ आशीर्वाद कायम असावेत अशी अपेक्षा राजुभाई खुरेशी यांनी यावेळी केली.

No comments