Breaking News

परळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती अन्नपुर्णा शंकरराव आडेपवार यांनी स्विकारला पदभार

परळी : येथील नगर पालिकेच्या विषय समितीच्या निवडी करण्यात आल्या होत्या.आज नवनिर्वाचित सभापती सौ.अन्नपुर्णा शंकरराव आडेपवार यांनी आपल्या बांधकाम सभापतीपदाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकारला आहे.यावेळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्ताने कार्यालयात केक कापुन अभिष्टचिंतन केले.


सामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडे व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी विकासाच्या दृष्टीने शहरात विकास कामांचा रथ अधिक गतीने केल्या जाईल असे सभापती पती तथा राष्ट्रवादी नेते शंकर आडेपवार यांनी मनोगत व्यक्त केले.नगर परिषदेचे कार्यलयीन अधिक्षक संतोष रोडे यांच्या उपस्थित पारपडला. नगर परिषदेच्या बांधकाम सभापती सौ.अन्नपुर्णा आडेपवार यांनी पदभार स्विकारतांना नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, सभापती गोपाळ आंधळे, जयपाल लाहोटी ,नगरसेवक चेतन सौंदळे, अनंत इंगळे, माधवराव रोडे, श्रीकांत ढेले, बालाजी चाटे अदीची उपस्थिती होती.


No comments