Breaking News

सय्यद मोमीन एजाज यांचा सत्कार


बीड : गेवराई येथील सय्यद  मोमीन एजाज यांची एमआयएमच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने युवा नेते सय्यद इलयास यांनी त्यांचा सत्कार केला. 


एमआयएमचे बीड जिल्हाध्यक्ष अँड. शेख शफीक यांनी पक्षाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी सय्यद मोमीन एजाज यांची निवड करून नुकतेच त्यांना नियुक्तीतपत्र दिले आहे. याबद्दल   युवा नेते सय्यद इलयास यांनी सय्यद मोमीन एजाज यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी एमआयएमचे माजी जिल्हा प्रवक्ता हॅरिसन फ्रान्सेस रेड्डी, जिल्हा सरचिटणीस हाजी आयुब पठाण, युवा नेता खन्ना, युवा नेता सय्यद सैफ (लालू ) उपस्थिती होती.

No comments