Breaking News

जिव्हाळा ग्रुपच्या रक्तदान शिबिरात ११७ जणांनी केले रक्तदान


माजलगाव : राष्ट्रमाता जिजाउ मॉसाहेब यांच्या जयंतीनिमीत्त जिव्हाळा प्रतिष्ठाणच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन डाके हॉस्पिटल  येथे करण्यात आले.यात तहसीलदार ,गटविकास अधिकारी यांच्यासह अनेक महिलांनी रक्तदान केले.या शिबिरात ११७ जणांनी रक्तदान केले. या भव्य रक्तदान शिबीराचे उदघाटन तहसिलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते तर    गटविकास आधिकारी प्रज्ञा माने भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले ,महावितरणचे उप  कार्यकारी अभियंता सुहास मिसाळ ,महावितरणचे सहाय्यक अभियंता चेतन चौधरी ,जिव्हाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अजय डाके उपस्थित होते. कोवीडच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे.ही निकड ओळखुन जिव्हाळा प्रतिष्ठाणणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते..सामाजीक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून जिव्हाळा प्रतिष्ठाणणे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

No comments