Breaking News

मुख्याध्यापकांच्या गैरवर्तणुकीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार : शिक्षक रामकीसन सुरवसे करणार आमरण उपोषण

परळी :  परळीतील श्री सरस्वती विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हे सतत आपल्याशी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागतात व नेहमी गैरवर्तन करतात अशी तक्रार बीडचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिक्षक रामकीसन सुरवसे यांनी ही तक्रार केली असून, याच्या प्रति पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शिक्षण मंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. सदरील तक्रारींची दाखल घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी दि.13 जानेवारी पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

रामकीसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे, शाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचाऱ्यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचाऱ्यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचाऱ्यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात अली असून उद्यापासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही म्हटले आहे.

No comments