Breaking News

माजलगावमध्ये होणार राजकीय भुकंप ?


आ. प्रकाश सोळंके दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला

बाळासाहेब आडागळे । माजलगाव

येथील मतदार संघाचे आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके दि २५ जाने सोमवार रोजी अचानक ऐनवेळी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क विर्तकाला वेग आला असुन लवकरच माजलगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय भुकंप होण्याच्या चर्चाला उधान आले आहे.

यासंदर्भात सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि २५ जाने सोमवार रोजी माजलगाव पत्रकार संघाच्या वतिने मुकनायक दिनानिमित्त मुकनायक पुरस्कार व माजलगाव भुषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जुना मोंढा माजलगाव येथे दुपारी ३:०० वाजता होणाऱ्या  कार्यक्रमास पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ.प्रकाश सोळंके यांची उपस्थिती राहणार होती. या कार्यक्रमाची पत्रकार संघाच्या वतिने जुना मोंढा मैदान येथे भव्य स्टेज व मंडप उभारुन कार्यक्रामाची जय्यत तयारी सुरु आसतानांच दि २५ जाने सोमवार रोजी सकाळी १०:०० वाजता आ.प्रकाश सोळंके हे पत्रकार संघाच्या मुक नायक पुरस्काराकडे पाठ फिरवून ऐन वेळी दिल्लीला रवाना झाल्याने  असून भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेल्याचे समजते. त्यांच्या या भेटीत काय चर्चा होणार यावर राजकीय गोटात तर्क वितर्क लढविले जाऊ लागलेत. अचानकपणे आ. सोळंके यांच्या दिल्ली वारी वरून चर्चेला मात्र राजकीय वर्तुळात उधान आले आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिपद न  मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके हे नाराज असून ते भाजपच्या वाटेवर ? असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
No comments