Breaking News

विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी अॕप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे - तहसिलदार बेंडे यांचे आवाहन

शिरूर कासार : तालुक्यातील शेतकरी बांधवानी स्वत: आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 'ई पीक पाहणी' हे मोबाईलवरील अ‍ॅप विकसित केले या अ‍ॅपचा वापर करून शेतकरी स्वत: आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर करू शकणार आहेत.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंद असणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने सदर मोबाईल अ‍ॅपवर नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे हे अ‍ॅप शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचे? या अॕपचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पीककर्ज, पीकविमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे इत्यादी साठी वापर होणार आहे. पिक पाहणी सदर अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाईल.अ‍ॅपवरील माहिती मराठी भाषेत उपलब्ध सर्व शेतकऱ्यांना मोबाईलवर प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप सहज घेता येते. या अ‍ॅपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकतो. पिकाचा फोटो काढून तो अ‍ॅपवर 'अपलोड' करू शकतो. 

शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी त्यांच्या 'लॉग इन'वर उपलब्ध होणार आहे. त्याला तलाठ्यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तात्काळ होतो. ई-पीक पाहणी अ‍ॅपवरून शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केल्यास अचूक होईल.जे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून स्वत: ई-पीक पाहणी करणार नाहीत, त्यांच्या पिकाची नोंद सातबारावर होणार नाही. त्यामुळे त्यांना पीककर्जासह कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येतील यामुळे शेतकरी बांधवानी पीक विम्याचे विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी या अ‍ॅपद्वारे पिकाची नोंद करावी असे आवाहन शिरूर कासारचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.No comments