Breaking News

संभाजी ब्रिगेडचे महासचिव मा. शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांचा उद्या परळी दौरा

परळी : संभाजी   ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांचा मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी परळी दौरा असून या दौऱ्याचे वेळापत्रक सकाळी 10.00 वा. संभाजी ब्रिगेड तालुका संपर्क कार्यालय उद्घाटन जलालपुर, सकाळी 11 वाजता संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, दुपारी 03.00 वाजता कार्यकर्त्यांसाठी राखीव वेळ अनुसया पॅलेस, दुपारी 04.00 वाजता पत्रकार परिषद अनुसया पॅलेस,संध्याकाळी 07.00 वाजता मौजे करेवाडी येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुक्यातील पाच शाखांचे उद्घाटन होणार आहे.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवश्री प्रा. एम. एल. देशमुख, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री डॉ. बालाजी जाधव ,प्रमुख अतिथी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा भास्कर निर्मळ, प्रमुख अतिथी संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक शिवश्री शशिकांत कन्हेरे, प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेड बीड पूर्व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, संभाजी ब्रिगेड बीड मध्य जिल्हाध्यक्ष विजय दराडे ,संभाजी ब्रिगेड बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष महेंद्र मोरे ,संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर ,हे राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी परळी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड शाखा परळी तालुका तसेच मराठा सेवा संघ ,जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व सर्व कक्ष परळी वैद्यनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments