Breaking News

माजलगाव तालुका तलाठी संघटनेच्या दिनदर्शिकाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हास्ते प्रकाशन


माजलगाव तलाठी संघटनेचा माँ जिजाऊ जंयती दिनी आगळा वेगळा उपक्रम

माजलगाव :  येथील तालुका तलाठी संघटनाद्वारे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी प्रथमच माजलगाव तालुका तलाठी संघटनेच्या वतीने अध्यक्ष रुपचंद आभारे यांच्या संखल्पनेतुन यावर्षी २०२१ ची दिनदर्शिका काढण्यात आली असुन या दिनदर्शिकेच्या प्रकाशन माँ जिजाऊ जंयतीचे औचित्य साधून दि १२ जाने मंगळवार रोजी  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हास्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशन करण्यात आले.

माजलगाव तलाठी संघटनेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी माजलगाव तलाठी संघटनेच्या वतिने २०२१ ची दिनदर्शिका काढण्यात आली असुन या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे माजलगाव तालुक्यातील महसूल विभागातील कोतवाल, शिपाई तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे त्या त्या  महिन्यातील वाढदिवसाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे,माजलगाव तालुका तलाठी संघटनेच्या वतिने काढण्यात आलेल्या २०२१ च्या दिनदर्शिकेचे  प्रकाशन माँ.जिजाऊ जंयतीचे औचित्य साधून तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद आभारे यांनी दि १२ जाने मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रकशन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी  संतोष राऊत,बीड जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर राख,महाराष्ट्र तलाठी संघटनेचे कोष्याध्यक्ष अनिल सुत्रे,माजलगावचे मंडळ अधिकारी.विकास टाकणखार,माजलगावतालुका तलाठी संघटनेचे सचिव एस. व्ही.शिलवंत,तलाठी वडमारे,शंकर शिंदे, हनुमान काटकर,रोहित वगरे यांची यावेळी उपस्थिती होती.यापुढेही माजलगाव तालुका तलाठी संघतनेद्वारे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती माजलगाव तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष  रुपचंद एस.आभारे यांनी दै आदर्श गावकरीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

माजलगाव तलाठी संघटनेच्या इतिहासातील सर्वात उपक्रमशील अध्यक्ष ठरले रुपचंद आभारे

माजलगाव तालुका तलाठी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. परंतु मागील सात ते आठ महिन्यापासून रुपचंद एस आभारे यांनी तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तालुका तलाठी संघटनेद्वारे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याची नोंद जिल्ह्यात घेतली जात आहे. आपल्या दैंनदीन तलाठी कामाव्यतिरिक्त सामाजिक कामात सतत योगदान देण्याचं काम तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद आभारे हे करीत आहेत.

No comments